रत्नागिरी

नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे व पाणी सभापती निमेश नायर यांनी केली शिळ पंप हाऊस व पानवल धरणाची पाहणी

रत्नागिरी दि. ३१ :- शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे व पाणी सभापती निमेश नायर यांनी शिळ पंप हाऊस तसेच पानवल धरण येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरसेवक अभिजीत दुडे तसेच पाणी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान पाणीपुरवठा योजनांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पानवल धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या

शहरवासीयांना उन्हाळ्यात पाण्याची कोणतीही अडचण भासू नये यासाठी पाणी सभापति निमेशजी नायर तसेच प्रशासन यांचेकडून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असून, पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button