रत्नागिरी

अतीवेगाने नियम मोडून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करणे संदर्भात शिवसेना शहर महिला आघाडीचे शहर पोलिसांना निवेदन

रत्नागिरी दि. १९ :- काल शहरामध्ये अज्ञात वाहनाने धडक देऊन पडलेल्या अवस्थेत असताना त्यांच्यावर गाडी चालवल्यामुळे निष्पाप सुनिता साळवी यांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असणाऱ्या व अतीवेगाने नियम मोडून चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणे संदर्भात शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख सौ. स्मितल सुरेश पावसकर यांचे नेतृत्वाखाली शहर पोलीस निरीक्षक रत्नागिरी, तसेच शहर वाहतूक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे, नगरसेविका वैभवी खेडेकर, पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, सायली पाटील, निवेदिता कळंबटे, राजश्री पिळणकर, प्रीती सुर्वे, मेधा कुलकर्णी, रुकसाना जकी, दिशा साळवी, तसेच महिला पदाधिकारी प्रिया साळवी, रूपाली नागवेकर, योगिता खांडेकर, अवंती गोडपकर, समीक्षा वालम प्राजक्ता खेडेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button