रत्नागिरीराजकीय

संगमेश्वर तालुक्यात स्वबळाचा नारा देण्याऱ्या काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा

देवरूख दि. १५ (सुरेश सप्रे) :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसने संगमेश्वर तालुक्यात महाविकास आघाडीऐवजी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. परंतु स्वबळाचा नारा ठोकणाऱ्या काँग्रेसकडे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची वानवा असल्याचे अंतर्गत आकडेवारीवरून दिसून येत आहे.

निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असली तरी तालुक्यातील जिपचे सात गट व पं.सच्या चौदा गण अशा २१ जागांवर अजून एकाही इच्छुकाने काँग्रेसकडे निवडणूक लढवण्यासाठी अर्ज न केल्याचे वृत्त हाती आले असून संगमेश्वर तालुक्यात काँग्रेसची चिंता वाढली आहे.

संगमेश्वर तालुक्यामध्ये काँग्रेसकडे अद्याप एकाही इच्छुकाने अर्ज केलेला नाही.अशी माहिती हाती येत आहे. गट व गणामध्ये उमेदवारांचा शोध सुरू असल्याचे काँग्रेसच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने सांगितले .

काँग्रेसकडे अद्याप एकाही इच्छुक उमेदवाराने काँग्रेसकडून लढण्यासाठी अर्ज केला नसल्याचे समोर आले आहे. एकाही इच्छुकाने काँग्रेसकडे अर्ज केलेला नाही.

दरम्यान, ही निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या काँग्रेसच्या निर्णयामुळे शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांच्याशी युतीची शक्यता धूसर झाली आहे. बचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीतीही अजून गुलदस्त्यातच आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर केवळ राजकीय आव्हानच नव्हे, तर उमेदवार उभे करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button