रत्नागिरी

जिल्हाधिकारी यांनी घेतला नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा आढावा

रत्नागिरी, दि.१८ : जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (साप्रवि) विश्वजीत गाताडे, नगरपालिका प्रशासन जिल्हा सह आयुक्त वैभव गारवे आदी उपस्थित होते.

नामनिर्देशन व छाननी प्रक्रिया, प्रशिक्षण, मतदान केंद्रावरील सोयीसुविधा, मतमोजणी स्थळ सुरक्षा याबाबत सविस्तर आढावा घेऊन ही निवडणूक प्रत्येक टप्याणीवर काळजीपूर्वक, दक्षता घेऊन आत्मविश्वासाने पार पाडावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button