भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त नाचणे पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांकडून आशादिप संस्थेमध्ये मिठाई वाटप

रत्नागिरी दि. ७ :- आज भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त नाचणे पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांच्या स्व देणगीतून व मध्य मंडळ अध्यक्ष प्रतीक देसाई यांच्या मार्फत आशादिप गतीमंद मुलांच्या संस्थेमध्ये किराणा सामान व मिठाई वाटप करण्यात आली.
त्यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत यादव साहेब, महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा ताई ढेकणे, मध्य मंडळ अध्यक्ष प्रतीक देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री संदीप सुर्वे, जिल्हा सरचिटणीस ओमकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष बावा शेठ नाचणकर, मध्य मंडळ सरचिटणीस संकेत कदम, तालुका उपाध्यक्ष दिनेश रेमूळकर,महिला मोर्चा अध्यक्ष सुचिता नाचणकर, शहर अध्यक्ष दादा ढेकणे, नाचणे ग्रामपंचायत सदस्य दीप्ती फडके, शिवानी रेमूळकर, अनुष्का शेलार, सुमन घाणेकर, मेधा देवस्थळी, राकेश कदम, सुनील आडीवरेकर, समीर सावंत, सुनील नाचणकर, दिपक सुपल, विजय सुर्वे, पुंडलिक पावसकर, मुन्ना पारकर, अथर्व सावंत, यश सुर्वे, देव सुर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते



