भाजपाचे युवा नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांना वाढदिवसानिमित्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा!

मुंबई दि. १३ :- भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे तसेच नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी दादा ढेकणे व सौ. वर्षा ढेकणे यांनी अनिकेत पटवर्धन यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी कारकिर्दीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी पक्षाचे नगरसेवक उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर राजू तोडणकर नितीन जाधव बाबू सुर्वे सौ सुप्रिया रसाळ सचिन करमरकर अज्जू शिंदे संदीप रसाळ व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी मिळून अनिकेत पटवर्धन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.



