रत्नागिरी

केळ्ये येथील गोडबोले हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन 

रत्नागिरी दि. ८ ऑगस्ट : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या केळ्ये येथील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. याप्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या आणून त्यांचे महत्त्वही पटवून सांगितले. तसेच या भाज्यांची विक्रीसुद्धा केली.

याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व केळ्ये गावचे उपसरपंच काशिनाथ बापट यांचे स्वागत केले. रानभाज्यांची प्रदर्शने का आयोजित केली जातात, याबाबत सौ. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

काशिनाथ बापट यांनी रानभाज्यांची माहिती देताना करटोली, दिंडा, टाकळा, कुडा, आंबुशी, पाथरी, अळू, केना, कपाळ फोडी, बांबू, खापर फुटी, कुरडू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळ भाजी, आंबाडी, भुई आवळा, फोडशी, भारंगी, रान केळफूल आदी भाज्यांची माहिती सांगितली. या भाज्यांचे औषधी महत्त्व सांगून वर्षातून एकदा तरी या रानभाज्यांचे सेवन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. रानभाज्यांविषयी अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. सूत्रसंचालन सौ. अनघा रसाळ यांनी केले. शिक्षिका सौ. सानिका पंडित यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button