डिंगणीतील केदारेश्वर माध्यमिक विद्या मंदिरात माजी विद्यार्थी संघाची स्थापना

देवरुख दि. २३ :- डिंगणी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने केदारेश्वर माध्यमिक विद्या मंदिर डिंगणी यामधील माजी विद्यार्थी यांची सभा शिरोडकर हायस्कूल परळ येथे घेण्यात आली. सदर सभेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष प्रदिप पाकतेकर यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष सुधीर प्रदिप चाळके, खजिनदार महेश मिरगल, सहसचिव प्रदीप काष्टे तर सदस्यपदी दिपेश दिलीप चाळके, मंगेश पाताडे व इतर सदस्यांची निवड करण्यात आली.
माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासाठी शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे. माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या शैक्षणिक विकासात थेट सहभागी करून घेणे, शिक्षणाचा दर्जा ग्रामीण व शहरी भागात समान रीतीने उंचावण्यास मदत करणे.माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशापासून शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे.
माजी विद्यार्थ्यांचे आपल्या गावाशी, मातीशी संबंध दृढ करणे. या उपक्रमासाठी सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार डिंगणी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पेजे यांचे उपस्थित सदरची सभा घेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला.


