झरेवाडी येतील रस्ता कामाचे भूमिपूजन भाजपा तालुकाध्यक्ष श्री. दादा दळी यांच्या हस्ते संपन्न

रत्नागिरी दि. ८ :- भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे यांनी मंजूर केलेल्या विकासनिधीतून झरेवाडी येथील श्री. अरविंद कळंबटे वेल्डिंग वर्क्स ते श्री. अवधूत कळंबटे यांचे घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन बुधवारी दि. ७ रोजी भाजपा दक्षिण रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. दादा दळी यांचे हस्ते झाले.
यावेळी दळी साहेब यांचे सोबत टिके गावाचे माजी सरपंच व चांदेराई, हरचिरी विभागाचे भाजपचे नेते श्री. गुरुदास गोविलकर, लीगल सेलचे तालुका अध्यक्ष ॲड. अवधूत कळंबटे, तालुका उपाध्यक्षा सौ. नेहा कळंबटे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. मोहन कळंबटे, मानकरी श्री. सुभाष कळंबटे, वसंत कळंबटे, झरेवाडी भाजपा बूथ अध्यक्ष श्री. प्रविण कळंबटे व मोरेश्वर कळंबटे, ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी शितप, श्री. दिनेश तांबे, तालुका कार्यकारिणी सदस्य जयवंत कळंबटे, स्मिता गोताड व अन्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
याप्रसंगी श्री. गुरुदास गोविलकर व श्री. दादा दळी यांनी उपस्थितांना संबोधित केले. दादा दळी यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती देऊन हे महायुतीचे सरकार गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी झरेवाडी येथील मंजूर केलेल्या विकास कामांबाबत गावाच्या वतीने ॲड. अवधूत कळंबटे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब व ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरेसाहेब , अनिकेत पटवर्धन व तालुकाध्यक्ष श्री. दादा दळी यांचे आभार मानले.



