रत्नागिरीराजकीय

रत्नागिरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी आता १२ जानेवारीला निवडणूक

उपाध्यक्ष निवडीनंतर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती होणार जाहीर

रत्नागिरी दि. ७ :- रत्नागिरी नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी आता १२ जानेवारीला निवडणूक होणार आहे. नगर परिषदेकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, याचवेळी नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती होणार आहे.

दि. १२ जानेवारी रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत रत्नागिरी नगर परिषद, रत्नागिरी नामनिर्देशन पत्र सादर करणे (नियम ४, नमुना १). त्यानंतर सर्वसाधारण सभेला सुरुवात व प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी सकाळी ११.१५ वाजेपर्यंत रत्नागिरी नगर परिषद सभागृह येथे करणे, नामनिर्देशन पत्राच्या छाननी नंतर वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेवारांची नांवे जाहीर करणे, वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नांवे जाहीर केल्यानंतर नामनिर्देशन पत्रे मागे घेणे.

त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नांवे वर्णानुक्रमे जाहीर करणे, आवश्यकतेनुसार मतदान घेणे व निकाल जाहीर करणे असा उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम राहणार आहे.

उपाध्यक्ष निवडणूकीचा निकाल जाहीर झालेनंतर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती जाहीर करणेत येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button