मध्यप्रदेशमधील कोतवाली झाबुवा पोलिस स्थानकात नोंद असलेल्या खून प्रकरणातील फरारी संशयित आरोपींना रत्नागिरी येथे घेण्यात आले ताब्यात

रत्नागिरी दि. ३ :- मध्यप्रदेशमधील कोतवाली झाबुवा पोलिस स्थानकात नोंद असलेल्या खून प्रकरणातील फरारी संशयित आरोपींना रत्नागिरी येथे ताब्यात घेण्यात आले आहे.
कोतवाली झाबुवा पोलीस ठाणे, जि. झाबुवा राज्य. मध्यप्रदेश येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 340/2026,भारतीय न्याय संहिता कलम 191(1), 191(2), 191(3), 190, 103(1), 296(1), 351(2) अन्वये नोंद असलेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपी रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी म्हणून 1) दाउद सन ऑफ चिलिया वाकला, 2) नब्बु सन ऑफ चिलिया वाकला, 3) चिलिया सन ऑफ कलिसींग वाकला सर्व रा. झाबुवा मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा घडल्यापासून संबंधित आरोपी फरार होते. सदर आरोपीत यांना पकडण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली होती. सदरचे पथक आज रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकातील अंमलदार यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत त्यांना अटक करून पुढील तपासाकिरता संबंधित आरोपींना झाबुवा मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अप्पर पो अधीक्षक श्री. महामुनी तसेच उप विभागीय पो अधी श्री. माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विवेक पाटील व पो उ नि सागर शिंदे, सपोफौ/708 दीपक साळवी , पोहवा/754 भालचंद्र मयेकर, पोकॉ /78 निलेश शिंगावे यांनी केलेली आहे.


