क्रीडारत्नागिरी

क्रिस्टल चषक अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धेचा थरार आजपासून सुरू

रत्नागिरी दि. ३ :- रत्नागिरीमध्ये गेले अनेक दिवस चर्चेत असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या पहिल्यावहिल्या टर्फ क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात झाली. लांजा राजापूरचे आमदार श्री. किरण भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते हा सोहळा शिवरुद्र स्पोर्ट्स क्लब येथे संपन्न झाला.

शैक्षणिक, सांस्कृतिक अथवा क्रीडा क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन देणारे आमदार किरणभैया यांनी उद्घाटन प्रसंगी टर्फच्या या मैदानावर फलंदाजीचा आनंद घेतला.

या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, नगरसेविका सौ. पूजा पवार, सौ. मेधा कुलकर्णी, सौ. श्रद्धा हळदणकर तसेच नगरसेवक श्री निमेश नायर,श्री सौरभ मलुष्टे,श्री दत्तात्रय साळवी, श्री राजू तोडकर,श्री सचिन करमरकर,श्री विवेक सुर्वे, श्री दीपक पवार,बाजार समिती सभापती श्री संदीप सुर्वे,श्री प्रकाश रसाळ,तसेच शिवसेना शहर प्रमुख श्री बिपिन बंदरकर हे देखील उपस्थित होते.तसेच उद्योजक श्री ओंकार भाटकर,श्री अमेय वीरकर उपस्थित होते.अँड महेंद्र मांडवकर यांची देखील उपस्थिती लाभली.

यावेळी क्रिकेट वर्तुळातील नामवंत श्री हरीश लाडे, श्री दीपक मोरे श्री सुरेश जैन,सईद मुकादम, श्री. दिवाकर मयेकर, श्रीम. योगिता महाकाल त्याचप्रमाणे सहभागी टीम्सच्या कॅप्टन्सचा सत्कार मा. किरण भैया यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेच्या अत्यंत शिस्तबद्ध आयोजनाबद्दल किरण भैया यांनी क्रिस्टल ग्रुपचे अभिनंदन केले आणि सर्व टीम्स ना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button