रत्नागिरी

श्री देव मार्लेश्वर परिसरात उद्या स्वच्छता अभियान

सारे एकत्र येवुया, आपले श्रद्धास्थान देव मार्लेश्वर परिसर स्वच्छ ठेवूया

देवरूख दि. २ (सुरेश सप्रे) :- तालुक्यातील प्रसिद्ध असलेलला श्री देव मार्लेश्वरची यात्रा जवळ आल्याने मार्लेश्वर देवस्थान व देवरूख येथील आठल्ये सप्रे महाविद्यालयाचा सेवा योजना विभाग यांचे संयुक्त विद्यमाने उद्या दि ३ रोजी सकाळी ९ वाजता मार्लेश्वर परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

श्री मार्लेश्वर यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने या कड्याकपारीतील सर्व परिसर स्वच्छ व सुंदर असावा यासाठी स्वच्छ मार्लेश्वर सुंदर मार्लेश्वर चा नारा देत हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सारे एकत्र येवुया. आपले श्रद्धास्थान मार्लेश्वर परिसर स्वच्छ ठेवूया. या ब्रिदाला जागूया . यासाठी सर्व भाविकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button