रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून पंधरा दिवसात ४५९८ वनराई बंधारे
पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम

नाणीज दि. २ :- जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने केवळ पंधरा दिवसात 4598 वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. सात डिसेंबर ते 21 डिसेंबर या अवघ्या पंधरा दिवसात रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या अनुयायांनी रत्नागिरी सह राज्यभरविविध गावात जलस्त्रोतांवर 4598 कच्चे वनराई बंधारे बांधले आहेत.
रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी, यांनी आपल्या अनुयायांना जलसंवर्धनासाठी पाणी आडवा पाणी जिरवा याबाबत आवाहन केले आणि या कार्याने चळवळीचे स्वरूप धारण केले. अवघ्या पंधरा दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाचे कार्य होणं हे सोपी गोष्ट नाही गावागावात मोठमोठाले ओढे नद्यां यावर बांध घालून जलसंधारणाचे प्रशंसनीय काम केले आहे. या बंधाऱ्यामुळे भूजल पाटील वाढ होण्यास मदत होणार आहे.
मराठवाडा उपपीठाद्वारे मराठवाड्यातील विविध गावांमध्ये बंधारे बांधण्यात आले त्यामध्ये मार्च महिन्यापासून पाणीपातळी खालावते भीषण पाणीटंचाई जाणवू लागते यावर काही प्रमाणात मात करता यावी शेतीसाठी तसेच जनावरांना पाणी उपलब्ध व्हावे भूगर्भातील पाणी पातळी वाढावी या उद्देशाने हे कार्य हाती घेण्यात आले होते
जलप्रवाहांवर बंधारे बांधणे तशी सोपी गोष्ट नाही हे अतिशय कष्टाचे काम आहे पण श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या अनुयायांनी एकत्र येऊन समाजहितासाठी हे कार्य मोठ्या आनंदाने साकारले आहे, या कार्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी वैदेही रानडे, आमदार भास्कर जाधव इत्यादींनी कौतुक केले आहे,
उपपीठ मराठवाडा 1660
उत्तर महाराष्ट्र 594
पीठ नाणीजधाम 489
पूर्व विदर्भ 465
क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र 448
उपपीठ तेलंगणा 264
मुंबई विभागाच्या वतीने 181 उपपीठ गोवा 169
उपपीठ पश्चिम विदर्भ 146
उपपीठ गुजरात 80
छत्तीसगड 73
मध्यप्रदेश 28
उपपीठ जम्मू काश्मीर 1 तसेच 4598 बंधारे बांधले आहेत.



