रत्नागिरी

पैसा फंडची वेदा चिचकर विज्ञान शाखेत संगमेश्वर तालुक्यात प्रथम; मिळवले ८०:१७ टक्के गूण

संगमेश्वर दि. ३ ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वरच्या बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला प्रशालेतील वेदा शैलेंद्र चिचकर या विद्यार्थिनीने ८०:१७ टक्के गुण प्राप्त करत संगमेश्वर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. वेदाच्या या यशाबद्दल तिचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी अभिनंदन केले आहे.

वेदा शैलेंद्र चिचकर ही विद्यार्थिनी शांत आणि अभ्यासू म्हणून प्रशालेत ओळखली जात होती. सातत्यपूर्ण अभ्यास आणि दिलेला अभ्यास वेळच्यावेळी पूर्ण करण्याची तिची सवय यामुळे तिने वर्षभर प्रशालेत झालेल्या परीक्षांमध्ये चांगले गुण प्राप्त केले होते. बारावी विज्ञान शाखेत ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवायचे असे वेदाचे स्वप्न होते. तिने ८०:१७ टक्के गुण मिळवत आपले स्वप्न साकार केले. एवढेच नव्हे तर , ती प्रशालेत पहिली आलीच मात्र संगमेश्वर तालुक्यातही वेदाने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. वेदाच्या या यशाबद्दल तिचे संगमेश्वर तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button