रत्नागिरी

गोळपचे पोलिस पाटील निलेश भाटकर यांनी महिला वृध्दाश्रमात केला वाढदिवस साजरा

रत्नागिरी दि. ३१ :- येथील गोळप गावचे पोलिस पाटील निलेश भाटकर यांनी पावस येथील अनसूया आनंदी महिला वृध्दाश्रमात येथील वृध्द आजींसमवेत आपला वाढदिवस साजरा केला.

महसूल विभागाच्या जिल्हा पुरस्काराने गौरविलेले गोळपचे पोलिस पाटील श्री.भाटकर हे नेहमीच आपला वाढदिवस महिला वृद्धाश्रमातील मातांसमवेत अगदी साध्या पद्धतीने मित्रमंडळींच्या उपस्थितीत साजरा करीत असतात. गेली सात वर्षे ते वृध्दाश्रमात जाऊन तिथल्या वृध्द मातांच्या आशिर्वादाने आपला वाढदिवस साजरा करीत असून गेल्या सात वर्षांत यामध्ये खंड पडला नाही.

यावेळी वृध्दाश्रमातील मातांना आवश्यक वस्तू श्री.भाटकर यांचे तर्फे भेट म्हणून देण्यात आल्या. या वाढदिवस सोहळ्याला ना. उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील, शिवसेना गोळपचे विभाग प्रमुख नंदा मुरकर, पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विक्रमसिंग पाटील, गोळप उपसरपंच संदीप तोडणकर प्रवीण शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक अवधूत सुर्वे, श्री. झोरे , कुबडे, महाडिक, शिंदे, साळवी कॉन्ट्रॅक्टर विक्रम पुजारी, नरेंद्र पुजारी, सचिन शिंदे, राजेश पावसकर, ॲड. संदिप पावसकर, दीपक भाटकर, रमण मयेकर, जितेंद्र शिरसेकर, विजय चव्हाण, बाबू लांजेकर, संतोष कदम, वृध्दाश्रम संचालिका फडके मॅडम, खातू मॅडम, देसाई मॅडम, पोलिस पाटील नितीन खाडे, राजन उभारे, सुधीर वाळिंबे, प्रविण मेस्त्री, संतोष लाड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button