
संगमेश्वर दि. ३१ ( प्रतिनिधी ):- रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन व संगमेश्वर तालुका खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा जोड जिल्ह्यास्तरीय पुरुष खुला गट व १४ वर्षे वयोगट मुलगे खो-खो स्पर्धा: २०२६”चे आयोजन शुक्रवार दि. ०२, जानेवारी व शनिवार दि. ०३ जानेवारी, २०२६ या कालावधीत केले जाणार आहे. या स्पर्धा सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, सोनवडे संचलित माध्यमिक विद्यालय, सोनवडे व आजी-माजी विद्यार्थी माध्यमिक विद्यालय, सोनवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या आहेत. दोन गटांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या खो-खो स्पर्धेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत.
माध्यमिक विद्यालय, सोनवडेच्या किडांगणावर शुक्रवार दि. ०२ जानेवारी, २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता या स्पर्धेचा श्री गणेशा होणार आहे. लहान गट मुलगे स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रु. ६०२५/-, द्वितीय क्रमांक रु. ४०२५/-, तृतीय क्रमांक रु. २०२५/- आणि चतुर्थ क्रमांक रु. १०२५/- चे पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. तर पुरुष खुला गट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रु. ११,०२५, द्वितीय क्रमांक रु. ८०२५/-, तृतीय क्रमांक रु. ५०२५/- आणि चतुर्थ क्रमांक रु. ३०२५/- चे पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे.
स्पर्धेच्या नीटनेटक्या आयोजनासाठी आजी-माजी विद्यार्थी, प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच संस्था पदाधिकारी मेहनत घेत आहेत. स्पर्धेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी शेखर गुरव- ७५८८६७१६१२, प्रितेश भुरवणे- ९४०५०५९०३८, क्रीडा शिक्षक: अभिजीत कदम- ९९७०२३१३५३ आणि प्रतीक उबारे- ९४०३९६०३६८ यांच्याशी संपर्क साधावा व सर्व खो-खो प्रेमींनी उपस्थित राहून खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन स्पर्धा आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


