रत्नागिरीसामाजिक

डॉ. सायली महाजन बाल नेत्र शल्य चिकित्सक वालावलकर रुग्णालयामध्ये उपलब्ध

संगमेश्वर दि. २२ ( प्रतिनिधी ):- डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात ता. २४ मे रोजी के. ई.एम हॉस्पिटलच्या नेत्रतज्ञ डॉ. सायली महाजन उपलब्ध होणार आहेत डॉ.सायली महाजन या के. ई.एम. हॉस्पिटल मध्ये बाल नेत्र शल्य चिकित्सक म्हणून के. ई. एम.हॉस्पिटलच्या नेत्र विभागात कार्यरत आहेत. त्या लहान बाळांमध्ये असणारे तिरळेपणा, लहान बाळांचे मोतीबिंदू, काच बिंदू यासारख्या अद्यावत शस्त्रक्रिया मध्ये पारंगत आहेत.

तरी कोकण वासियांच्या सेवेसाठी भ.क.ल.वालावलकर रुग्णालयामध्ये आत्ता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी उपस्थित राहणार आहेत. तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय तर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button