रत्नागिरी

स्पेस टॉकचे सी ई ओ मिलिंद चिंगळे यांची पैसा फंड कलादालनाला भेट

संस्थेच्या कला विषयक उपक्रमांचे कौतुक

संगमेश्वर दि. २० ( प्रतिनिधी ):- पुणे येथील ख्यातनाम स्पेस टॉक स्टुडिओचे सी ई ओ मिलिंद चिंगळे यांनी कुटुंबियांसमवेत शनिवारी सायंकाळी व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कला दालनाला भेट दिली. संस्थेच्या सर्व कला विषयक उपक्रमाचे चिंगळे यांनी कौतुक केले.

पैसा फंड इंग्लिश स्कुलचे पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी संस्था आणि प्रशालेच्या वतीने मिलिंद चिंगळे यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी मिलिंद चिंगळे यांची स्थापत्य विशारद कन्या, पत्नी आणि अन्य कुटुंबीय, तसेच प्रशालेचे सेवक अनंत जाधव उपस्थित होते. प्रारंभी कला विभागतर्फे उभारण्यात आलेल्या ९ फूट उंचीच्या पेन्सिलची आणि त्यासमोरील अर्थपूर्ण चित्राची चिंगळे यांनी पहाणी केली.

सन २००८ – ०९ स्वतंत्र कलावर्ग आणि त्यानंतर उभारण्यात आलेल्या कलादालन उपक्रमाचा विद्यार्थ्यांना कसा लाभ झाला याबद्दल चिंगळे यांनी माहिती जाणून घेतली. याबरोबरच गेली २६ वर्षे विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रांचा ‘ कलासाधना ‘ हे चित्रकला वार्षिक पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची असणारी कला विषयातील प्रगती थक्क करणारी असल्याचे चिंगळे यांनी यावेळी नमूद केले.

पैसा फंड कलादालन चित्रकार ‘ पाथरे ‘ यांच्या कलाकृतीनी समृद्ध झाले असल्याचे चिंगळे यांनी नमूद केले. कलादालनात येणारी यापुढील चित्रे आपण अत्याधुनिक पद्धतीने फ्रेम करुन देवू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. व्यापारी पैसा फंड संस्था विद्यार्थ्यांमधील विविध प्रकारच्या कला जोपासण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याबद्दल चिंगळे यांनी समाधान व्यक्त केलं. मिलिंद चिंगळे यांच्या चिरंजीवाची तीन चित्र पैसा फंड कलादालनामध्ये लावण्यात आली आहेत, त्याचीही सर्व कुटुंबियांनी बारकाईने पाहणी केली.

प्रशालेच्या कला विभागाला आणि कलादालनाला भेट दिल्या बद्दल संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी मिलिंद चिंगळे व त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद देवून कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button