रत्नागिरीसामाजिक

स्पर्श फाउंडेशनच्या दिव्यांग मुलांचे स्नेहसंमेलन उत्साहात

रत्नागिरी दि. २७ : शहरातील स्पर्श फाउंडेशनच्या दिव्यांग मुलांचे सोमवारी शहरातील शिवाजीनगर येथील ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये स्नेहसंमेलन पार पडले. या स्नेहसंमेलनासाठी स्पर्श फाउंडेशनचे १९ विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी या स्नेहसंमेलनासाठी महिला व बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे, उपसभापती पूजा पवार, नगरसेविका मेधा कुलकर्णी, नगरसेवक राजीव कीर, स्पर्श फाउंडेशनच्या प्रमुख प्रिया गांधी, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सुभाष थरवळ, कार्याध्यक्ष निंबाळकर, ऋचा गांधी, सुवर्णा चौधरी, अश्विनी मयेकर अन्य मान्यवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम पवार यांनी केले आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्श फॉर हेल्थ थेरेपी सेंटर मध्ये विविध शाळांमधील ज्या मुलांचा उशिरा विकास होतो, तसेच काही मुलांचा मेंदूचा पक्षाघात झालेला असतो अशा स्वरूपातील मुले येतात. या मुलांचा आत्मविश्वास वाढावा या मुलांसाठी स्टेज कसे असते कार्यक्रम कसा असतो त्यांचा आत्मविश्वास वाढवा तसेच त्यांच्यातली जी भीती आहे ती नष्ट व्हावी या उद्देशाने हे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते २०१९ सालापासून हे थेरपी सेंटर रत्नागिरी मध्ये सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button