माजी खासदार गोविंदराव निकम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन

चिपळूण दि. १८ : रत्नागिरीचे माजी खासदार, सहकार व शिक्षण महर्षी गोविंदराव निकम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन केले आहे.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बुधवार दि.०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे ता. चिपळूण येथे आयोजन केले आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी घरात हवेत आजी आजोबा, सोशल मीडियाचे समाजावर होणारे परिणाम हे विषय आहेत.
वक्तृत्व स्पर्धा केवळ मराठी भाषेतच होईल. प्रत्येक स्पर्धकास आपले विचार मांडण्याकरिता ५+२ मिनिटांचा कालावधी असेल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापकांच्या सहीसह प्रवेशिका जमा करणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी प्रवास खर्च स्वतः करावयाचा आहे. स्पर्धा वेळेवर सुरू होईल. स्पर्धा सुरू असताना प्रत्येक स्पर्धकाने सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी एका शाळेतील केवळ दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. वक्तृत्व स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी रसिका सुर्वे (८३६९७६२३९७), प्रणित राजेशिर्के ( ८४११०६६८७२) यांच्याशी संपर्क साधावा.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे बुधवार दि.०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ यावेळेत सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे ता. चिपळूण येथे आयोजन करण्यात आले आहे. इतिहासातील स्त्री व आजची स्त्री, संगणक साक्षरता-काळाची गरज हे विषय आहेत. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आहे. स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धकांकडून निबंध लिहून घेतले जाणार आहेत.
या स्पर्धेसाठी निबंध मराठी भाषेत स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला असावा. निबंध सुवाच्च अक्षरात लिहिलेला असावा. निबंधामध्ये शुद्धलेखनाच्या चुका व खाडाखोड टाळावी. लेखनासाठी निळ्या किंवा काळ्या रिफीलच्या बॉलपेनचा वापर करावा. निबंध लेखनासाठी कागद आयोजकांकडून देण्यात येतील. निबंध पाठपोट लिहू नये. निबंधाचे लिखाण विषयानुरूप असावे. विषयबाह्य लिखाणाचा विचार करण्यात येणार नाही. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. निबंध किमान २५० ते ३०० शब्दांचा असावा. प्रवेशिकांमधील निबंध प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांचा असेल. याबाबत भविष्यात स्पर्धकाला कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही. निबंधांची तपासणी तज्ज्ञ परीक्षकांमार्फत करण्यात येईल. स्पर्धेच्या नियम व अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहील. स्पर्धेचा निकाल विजेत्यांना कळविण्यात येईल. बक्षीस वितरण समारंभासाठी विजेत्यांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे. शाळेतील कितीही विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी प्रणिता दिंडे (९०४९११५७६५), अक्षता घाग (९६८९७९२९३०) यांच्याशी संपर्क साधावा.
दोन्ही स्पर्धांसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रू ५०००/-, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकसाठी रोख रू ३०००/-, चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रू २०००/-, चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके आहेत
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमात गोविंदरावजी निकम यांच्या स्मारकस्थळी सावर्डे ता. चिपळूण येथे होणार आहे.



