रत्नागिरी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन

रत्नागिरी दि. २३ :-  गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद दि. २१, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली. या परिषदेला देश विदेशातील संशोधक यांनी मार्गदर्शन केले. दि २१ नोव्हेंबर रोजी डॉ. अकबर इनामदार, डॉ. के. जी. डॅनियल, डॉ. योगेश ओस्वाल, प्रा. स्वप्नदीपसिंग चिम्णी यांची व्याख्याने झाली. तसेच दि. २२ नोव्हेंबर रोजी डॉ. प्रदीप कुमार, डॉ. मीरा माईणकर, डॉ. विनायक कुलकर्णी, डॉ. प्रदीप सरवदे आणि डॉ. विश्वनाथ पाटील यांची व्याख्याने झाली.

परिषदेदरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी महाविद्यालयामार्फत संशोधन भित्तिपत्रिका सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ३६ भित्तिपत्रिकांचे सादरीकरण झाले. स्पर्धा मूलभूत विज्ञान आणि जैविक विज्ञान या दोन विभागात घेण्यात आली. या स्पर्धेत मूलभूत विज्ञान या विभागात (१) नम्रता गांधी, दापोली अर्बन बँक सीनियर कॉलेज (२) पद्मनाभ सरपोतदार, गोगटे जोगळेकर कॉलेज (स्वायत्त), रत्नागिरी हे प्राध्यापक/ संशोधक विजयी झाले. मूलभूत विज्ञान ह्या विभागात (१) कौस्तुभ सरदेसाई, सार्थक जोशी, साक्षी पाध्ये, स्वरदा केळकर, गोगटे जोगळेकर कॉलेज (स्वायत्त), रत्नागिरी, (२) अथर्व बेंबळगे, श्रीकांत जाधव, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे हे विद्यार्थी यशस्वी झाले. तसेच या स्पर्धेत जैविक विज्ञान या विभागात (१) प्राची भाटिया, गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबई (२) रूपाली साळुंखे, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे हे प्राध्यापक/ संशोधक विजयी झाले. जैविक विज्ञान ह्या विभागात (१) ऋतुराज पिलणकर, गोगटे जोगळेकर कॉलेज (स्वायत्त), रत्नागिरी (२) निकिता राशिनकर, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड हे विद्यार्थी यशस्वी झाले.

परिषदेमध्ये देशविदेशातील महाविद्यालये व संशोधन संस्था तसेच उद्योजक सहभागी झाले होते. प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांनी वैज्ञानिक क्षेत्रातील विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले. एकूण ६६ शोधानिबंधांचे सादरीकरण झाले. शोधनिबंध सादरीकरण विभागात मूलभूत विज्ञान विभागातून (१) शुभम द्वारकेश जितुरी, यशवंतराव चव्हाण इंस्टीट्यूट ऑफ सायन्स, सातारा (२) रेश्मा देवरुखकर, गोगटे जोगळेकर कॉलेज (स्वायत्त), रत्नागिरी (३) सर्वेश कुंदरगी, डी बी जे महाविद्यालय, चिपळूण आणि जैविक विज्ञान विभागातून (१) मिथिला चिंचळकर, मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड (२) दिपाली सुरवशे, देवचंद कॉलेज, अर्जुन नगर (३) फरहीन खान, गोगटे जोगळेकर कॉलेज (स्वायत्त), रत्नागिरी तसेच ऑनलाइन विभागात (१) सुनिलकुमार गुलाबचंद गुप्ता, मिठीबाई कॉलेज (२) प्रशांत परशुराम जाधव, एएसपी कॉलेज, लांजा हे उत्कृष्ट शोधनिबंध म्हणून गौरविले गेले. यापैकी पूर्ण लांबीच्या ४२ शोधनिबंधांची आयएसबीएन प्राप्त पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच संशोधन निबंधांच्या सारांश पुस्तिकेचे प्रकाशन उद्घाटन प्रसंगी डॉ. अलिमिया परकार यांच्या हस्ते करण्यात आले.

समारोप प्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. संजय भावे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनातशेतीचा अभ्यास हा मूलभूत विज्ञानाचा भाग आहे. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने केलेले संशोधन प्रत्येक संशोधकाने केले पाहिजे. तंत्रज्ञानाची सांगड आपल्या संशोधनात घालता आली पाहिजे. शिक्षकांना मार्गदर्शन करताना सरानी सांगितले की विद्यार्थ्याना त्यांच्या आवडत्या विषयात संशोधन करू दे नाही की शिक्षकांच्या आवडीच्या विषयात संशोधन करायला द्या. भारत अतिशय आनंदी देश आहे असे गौरवोद्गार कुलगुरुनी काढले. विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत, नवीन कल्पकता सातत्याने दाखवली पाहिजे असे मत व्यक्त डॉ. भावे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समन्वयक डॉ. मधुरा मुकादम उपस्थित होते. परिषदेच्या समनव्यक डॉ. मधुरा मुकादम यांनी दोन दिवसाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button