रत्नागिरीराजकीय

अपक्ष उमेदवारांना मनवण्यात पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांना यश

महायुतीचा विजय निश्चित; पालकमंत्री ना. सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

रत्नागिरी दि. २१ :- रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना मनवण्यात पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत हे यशस्वी झाले असून, भाजपाच्या पदाधिकारी प्राजक्ता रुमडे यांचेसह विभव पटवर्धन, कामना बेग, शुभम साळुंखे आदींनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. आज शुक्रवारी पालकमंत्री ना. सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

यावेळी भाजपाचे ॲड. दीपक पटवर्धन, दादा ढेकणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. सामंत म्हणाले की, नगर परिषदेची निवडणूक ही महायुती एकत्रित लढवत आहे. या निवडणुकीत काही समज – गैरसमजातून काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यासंदर्भात काल संतोष पावारी यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री या नात्याने आपण स्वतः आणि ॲड. दीपक पटवर्धन उपस्थित होतो. या बैठकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात श्रीमती रुमडे यांना आपण विनंती केली. त्यांनीदेखील सन्मान आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. परंतु, शहरात सामाजिक कार्य करत असताना आपल्यालाही सन्मानाचे पद मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार नगर परिषद मध्ये एकूण ती स्वीकृत नगरसेवक पदांपैकी भाजपाच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक पद असल्याने ते श्रीमती रुमडे यांना देण्याची भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली असून, आपला देखील त्याला पाठिंबा असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आपले अर्ज मागे घेतील, असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला. त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय आता निश्चित. झाला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे या भरघोस मतांनी निवडून येतील असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button