रत्नागिरी

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात गोगटे जोगळेकरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

रत्नागिरी दि. २१ :- युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरा जतन, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार करते. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय महोत्सव काल दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल मारुती मंदिर बॅडमिंटन हॉल रत्नागिरी येथे पार पडला. या महोत्सवात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.

ज्यामध्ये, लोकनृत्य गोगटे जोगळेकर महाविद्यालयात – ग्रुप प्रथम

लोकगीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात- ग्रुप प्रथम

चित्रकला स्पर्धेत प्राप्ती आलीम प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी शिंदे द्वितीय •तन्वी सावंत हिने तृतीय क्रमांक पटकावला .

विज्ञान प्रदर्शन प्रथम आणि तृतीय क्रमांक – गोगटे जोगळेकर महाविद्यालय

विभागीय स्तरासाठी सांगली येथे स्पर्धा होणार आहेत.

प्रा. वेदांग सौंदलगेकर, प्रा. हरेश केळकर, प्रा. कश्मिरा सावंत, प्रा. बाबा सुतार, प्रा.शुभम पांचाळ, श्री. ओंकार बंडबे, श्री. गौरव बंडबे, गौरी साबळे, रोहित शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्पर्धे संदर्भात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी मार्गदर्शन केले.सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई , कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले .!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button