रत्नागिरी

कलाकृतींतून कोकणचा निसर्ग पु. ल. देशपांडे कलादालन प्रभादेवी येथे कलारसीकांच्या भेटीला

२३ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान प्रदर्शन; सकाळी ११ ते ७ पर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले

संगमेश्वर दि. २१ ( प्रतिनिधी ):- कोंकणातील अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात कलाकार मंडळीनी निसर्गचित्रण करून ग्रामीण भागातील नागरिकांची मने जिंकावित तसेच शहरातील दर्दी कला रसिकांकडून त्यांच्या कलाकृतींना दाद मिळावी म्हणून या ३२ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कलाकारांच्या मांदियाळीचे आयोजन ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार प्रकाश अ. राजेशिर्के व पुष्कर पर्यटन केंद्राचे संचालक पुष्कर संदानंद चव्हाण यांनी कोंकणातील चिपळूण तालुक्यातील गांग्रई या निसर्गरम्य गावातील पुष्कर कृषी पर्यटन केंद्राच्या परिसरातील जागेवर निवासी पध्दतीने कला-पुष्कर-राज रंगरेखा कार्यशाळेचे आयोजन ०६ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत केलेले होते. येथे साकारलेल्या सर्व कलाकृतींचे प्रदर्शन कलादालन पु. ल. देशपांडे प्रभादेवी मुंबई येथे २३ जानेवारी ते २९ जानेवारी २०२६ दरम्यान भरवण्यात येत आहे. मुंबईतील कलारसीकांनी कोकणच्या या निसर्ग कलाकृतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी केले आहे.

या कार्यशाळेतील कलाकारांनी केलेल्या आपल्या स्वः मनातील भावभावनांची विविध स्पंदने अत्यंत आत्मियतेने चित्रित केलेली आहेत. त्यांच्या या कलाकृती या कलाप्रदर्शनात मांडण्यात आलेली आहे. या कलाकृती आपण पहात असतांना तुम्हां सर्वांना निश्चितपणे आवडतील असा विश्वास राजेशिर्के यांनी व्यक्त केला आहे. ही सर्व चित्रे सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरतील आणि चित्रातील विविध देखावे पाहिल्यांनतर आपली पावलेही नकळत कोंकणभूमीकडे वळतील . कोंकणातील नद्या, डोंगर, वनराई येथील माती, रस्ते, आकाश आणि वातावरणातील सततचा होणारा बदलांचा आस्वाद घेत असतांना या कलाकृती आपणास नकळतच बोलते करतील आणि आपणही त्यांच्याशी संवाद करण्यात यशस्वी व्हाल.

ज्याप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमातून कलाकारांनी कलाकृत्या साकारतांना त्यांना आलेल्या अनुभूतीचा आनंद आपल्यालाही येईल त्यामुळे आपला आनंदही व्दिगुणीत होईल हे निशिच्त. ही संपूर्ण कार्यशाळा केवळ कोंकणातील कलारसिकांसाठी नव्हे तर, इतरांसाठी एक वेगळाच अनुभव देईल. आपणास एखादी कलाकृती आवडली तर ती विकत घेण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. कलाकृतीच्या विक्रीच्या माध्यमातून येणा-या रक्कमेपैकी काही रक्कम कोंकणातील विविध सेवाभावी संस्थाना देण्यात येणार आहे असा राजशिर्के यांचा मानस आहे. यासाठी कला रसिकांचा हातभार असणे जरुरीचे आहे . या कार्यशाळेसाठी कलाकारांची निवास, प्रवास मानधन, अल्पोपहार, कलासाहित्य इत्यारजीदि व्यवस्था करण्यासाठी पुष्कर कृषी पर्यटन केंद्र-गांग्रई,माजी आम. सदानंद चव्हाण, आमदार शेखर निकम, सहयाद्रि स्कूल ऑफ आर्ट-सावर्डे, कॅम्लिग कंपनी मुंबई, पुष्कर संदानंद चव्हाण आणि कुटुंबिय, प्रा. प्रकाश अ. राजेशिर्के आणि कुटुंबियांचे आणि इतर अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

कलारसिकांना संधी

चिपळूण तालुक्यातील गांग्रई येथे असणारा निसर्गाचा अद्भुत नजारा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर, देशातील ३२ नामवंत कलाकाराने आपल्या कुंचल्यातून साकारला होता. कलाकारांनी रेखाटलेल्या निसर्गाच्या या विविध छटा मुंबईतील कलारसिकांना पाहता याव्यात या दृष्टीने हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनातून होणाऱ्या चित्र विक्री मधील काही रक्कम कोकणातील सेवाभावी संस्थांसाठी दिली जाणार आहे. मुंबईसह आजूबाजूच्या सर्व भागातील कलारसिकांना कोकणातील हा अद्भुत निसर्ग पाहण्याची संधी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार असून कलारसीकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

— प्रकाश राजेशिर्के, ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार सावर्डे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button