रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला आय.एस.ओ 9001:2015 प्रमाणित स्मार्ट पोलीसिंग प्रमाणपत्र प्राप्त

रत्नागिरी दि. १५ :- रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व 19 पोलीस ठाणे, 4 उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालये तसेच । मोटर परिवहन विभाग, रत्नागिरी यांच्याकरिता आय.एस.ओ 9001:2015 (QMS-Quality Management System) प्रमाणित स्मार्ट पोलीस स्टेशन अंमलबजावणी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी दिनांक 01 जून 2014 रोजी SOAR मॅनेजमेंट सर्विसेस अँड SOAR कॅन्सलटिंग सर्विसेस, चिंचवड, पुणे यांना रत्नागिरी पोलीस दलाकडून प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.

या प्रस्ताव अन्वये महाराष्ट्र पोलीस आणि भारत सरकार यांनी विहित केलेल्या महाराष्ट्र पोलीस कायद्या नुसार, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखणे आणि जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे व नागरिकांना विविध सेवा प्रदान करणे तसेच पोलीस विभागाची स्थापना, सर्व प्रकारची कागदपत्रे आणि आवश्यक पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे प्रशिक्षण तसेच सबंध पोलीस विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची कार्यक्षमता, प्रयत्न आणि एक संघ म्हणून काम करण्याची इच्छा, अश्या निकषांचा समावेश होता.

तरी, वरील नमूद सर्व निकषांची व बाबींची SOAR मॅनेजमेंट सर्विसेस अँड SOAR कॅन्सलटिंग सर्विसेस, चिंचवड, पुणे यांच्या मार्फत 90 दिवसांमध्ये अवलोकन व पडताळणी करण्यात आली. या सर्व निकषांच्या मूल्यांकनानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व 19 पोलीस ठाणे, 4 उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालये तसेच । मोटर परिवहन विभाग, रत्नागिरी यांना आय.एस.ओ. 9001:2015 (क्यू.एम.एस) प्रमाणित स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकन देण्यात आलेले आहे.

या प्राप्त आय.एस.ओ. 9001:2015 (क्यू.एम.एस) प्रमाणित स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकन प्रमाणपत्रे आज दिनांक 14 नोवेंबर 2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते मासिक गुन्हे आढावा बैठक दरम्यान सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच मोटर परिवहन विभाग यांना देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button