महाराष्ट्रराजकीय

नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आमदार निरंजन डावखरे यांनी घेतल्या बैठका 

मुंबई दि. १० :- आगामी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने, रत्नागिरी उत्तर व दक्षिण विभागाची निवडणूक प्रभारी म्हणून भाजपा पक्षातर्फे मिळालेल्या जबाबदारीनुसार आमदार निरंजन डावखरे यांनी  चिपळूण, रत्नागिरी येथे विविध तालुका व विभागनिहाय बैठकांचा आढावा घेतला.

या बैठकांमध्ये निवडणुकीतील रणनीती, संघटन बळकटीकरण आणि स्थानिक प्रश्नांच्या निराकरणाबाबत सखोल चर्चा झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा पाहून विजयाची दिशा स्पष्ट दिसत आहे.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, माजी आमदार श्री. विनय नातू, माजी आमदार श्री. सूर्यकांत दळवी, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. सतीश मोरे, चिपळूण विधानसभा नेते श्री. प्रशांत यादव, खेड माजी नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button