रत्नागिरी

मालगुंड प्रा. शाळा नं. २ येथे राष्ट्रीय पंधरवडा कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांचे ओडिसा नृत्य ठरले लक्षवेधी!

गणपतीपुळे दि. २० (वैभव पवार) :-  रत्नागिरी तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा मालगुंड तळेपाट नंबर दोन शाळेमध्ये नुकताच राष्ट्रीय पोषण पंधरवडा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात शालेय मुलांनी ओडिसा नृत्य कलाप्रकार व वेशभूषा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच हा आगळावेगळा नृत्यप्रकार पालक व ग्रामस्थांसाठी खास लक्षवेधी ठरला. या कार्यक्रमात पालकांनी विविध पाककला पदार्थ यांचे प्रदर्शन मांडले होते.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा सावंत, सहशिक्षिका स्वरा चव्हाण आणि अंगणवाडी सेविका ज्योती पवार व पालक वर्ग यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्वा सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यानिमित्ताने मुलांना पौष्टिक गोड पदार्थ वाटप करण्यात आले. त्यानंतर आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button