रत्नागिरीराजकीय

रत्नागिरी शहरातील विविध समस्यांबाबत उबाठा सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांशी घेतली भेट

रत्नागिरी दि. २७ :- रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी रत्नागिरी शहरातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा केली.

यावेळी शिवानी मिहीर माने आणि शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर तसेच शहर संघटक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीट लाईटची व्यवस्था, स्वच्छता आदी महत्त्वपूर्ण अशा नागरी सुविधांबाबत मुद्देसूद चर्चा करण्यात आली. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, तसेच योग्य उपाययोजना राबवून प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी शिष्टमंडळाला दिला.

नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत रत्नागिरी नगर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच याबाबत योग्य ती पावले. उचलली जातील, असे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button