रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे हस्ते लोकार्पण

रत्नागिरी दि. १८ :- राज्याचे मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत विविध योजना राबविण्याबाबत पोलीस विभागाला सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीक, महिला, परदेशी नागरीक, तरुण मुले यांचेसाठी तसेच इतर विविध योजनेव्दारे नाविण्यापुर्ण उपक्रम सुरु करण्यात आलेले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे नुकत्याच झालेल्या रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम दरम्याने, रत्नागिरी पोलीस दलाने राबविलेल्या नाविन्यपुर्ण उपक्रमांचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, पालकमंत्री व उद्योग मंत्री श्री. उदय सामंत, गृह राज्यमंत्री श्री. योगेश कदम यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणारे नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती खालीलप्रमाणे – 

मिशन प्रतिसाद – ज्येष्ठ नागरींकाना तात्काळ पोलीस मदत पुरविण्या करीता

मिशन प्रगती – रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविणाऱ्या तक्रारदारांना त्यांचे दाखल तक्रारीचे तपासाबाबतची माहिती एसएमएसव्दारे पुरविण्यासाठी

मिशन मैत्री – परदेशी कामगारांसाठी ऑनलाईन पोर्टल

मिशन गती – दाखल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करुन, मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणेकरीता

मिशन संवेदना – महिलांच्या संदर्भातील दाखल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करुन, मा. न्यायालयात सादर करणे व सदर गुन्हयाची दोषसिध्दी प्राप्त करुन घेण्याकरीता

मिशन परिपुर्ती – पोलीस दलातर्फे राबवण्यिात येणाऱ्या डायल ११२ वरुन येणाऱ्या कॉलरची प्रत्यक्ष भेट घेवुन, त्यांचे तक्रारीचे निरसन झाले अगर कसे याबाबत माहिती घेण्यासाठी

मिशन गस्त – पोलीस दलातर्फे सर्व पोलीस ठाणे हद्दित महत्वाचे ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या बारकोड रात्रौ गस्त प्रभावी होणेसाठी, सदर बारकोड स्कॅन करणे

मिशन जिवन- ज्येष्ठ नागरीकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा उपक्रम

डिजीटल गाववारी – रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दितील असणारी गावांची माहिती डिजीटल स्कॅन करुन अपडेट करणेत आली.

मिशन निरीक्षण – पोलीस विभागातील सर्व वाहनांचे लोकेशन घेणेकरीता, पोलीस ठाण्यातील वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

मिशन फिनिक्स – रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करणेकरीता

सदर कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, पालकमंत्री व उद्योग मंत्री श्री. उदय सामंत, गृह राज्यमंत्री श्री. योगेश कदम, माजी आमदार श्री. राजन साळवी, जिल्हाधिकारी श्री. मनूज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामूनी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button