
तरवळ दि. २० (अमित जाधव) :- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी विभाग यांच्यावतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी तालुक्यातील तरवळ कोल्हेनगर येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी काम करीत असून, सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या साठी मोफत रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरवळ परिसरातील सर्व नागरिकांना एकाच ठिकाणी जनरल आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे, तसेच मोफत रक्तदाब आणि शुगर तपासणी, मोफत मार्गदर्शन व मोफत औषधे वाटप या भव्य मोफत आरोग्य शिबिरात करण्यात येणार आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी विभाग यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य शिबिराचा तरवळ तसेच परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या संस्थेचे सचिव केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष ॲड महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर व खालगाव विभाग प्रमुख सचिन गोताड यांनी केले आहे.



