रत्नागिरी

करबुडेतील वादळग्रस्त भागाची ना. उदय सामंतांकडून पाहणी

रत्नागिरी दि. १६ :- आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सकाळी 7 वाजताच रत्नागिरी दौऱ्यादरम्यान करबुडे गावातील वादळग्रस्त भागाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ना. उदय सामंत यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. वादळग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आपण ठामपणे आहोत, त्यांच्याकरिता आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असं वक्तव्य ना. उदय सामंत यांनी यावेळी केलं.

या पाहणीवेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, गावकर तांबे, प्रविण पांचाळ, सरपंच संस्कृती पाचकुडे, शंकर सोनवडकर, मंगेश सोनवडकर, वैभव कळंबटे, मिलिंद खानविलकर, सचिन पाचकुडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button