रत्नागिरीसामाजिक

बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या संचालकपदी रोहित मयेकर यांची नियुक्ती

तरवळ दि. २९ (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या संचालक पदी मालगुंड येथील युवा नेते शिक्षण प्रेमी रोहित मयेकर यांची निवड करण्यात आली आहे.

बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्था ही १९५५ ला स्थापन झाली असून बसणी या ठिकाणी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी जी. एम .शेट्ये या नावाने हायस्कूल चालविण्यात येत आहे, या हायस्कूल च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षण संस्था महत्त्वाचे काम करीत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम संस्थे मार्फत सुरू आहे.

अशा या तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थे मध्ये सदस्य काम करण्याची संधी मालगुंड येथील युवा नेते शिक्षण प्रेमी तसेच मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे संचालक रोहित मयेकर यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे.

बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून निवड झालेले रोहित मयेकर यांच्या मागे शिक्षण क्षेत्रातील मोठा वारसा आहे, शिक्षण क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व राहिलेले स्वर्गीय डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे.आणि त्यामुळे या शिक्षण संस्थे मध्ये डॉ. नानासाहेब मयेकर यांना जे शिक्षण क्षेत्रातील कार्य अभिप्रेत होते, ते कार्य त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे असे या वेळी त्यांनी स्पष्ट केले. या शिक्षण संस्थे मध्ये सदस्य म्हणून निवड झाल्या बद्दल यांचे शिक्षण क्षेत्रातून तसेच विविध माध्यमातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button