रत्नागिरीराजकीय

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांची निवड

आबा पाटील यांच्या निवडीने सर्वत्र उत्साहाचे वातावरण

मालगुंड दि. ५ :-  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. उदय सामंत आणि आमदार भैयाशेठ तथा किरण सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरीची शिवसेनेची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली.

या कार्यकारणीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विविध पदांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यातील महत्वाच्या असणाऱ्या उपजिल्हाप्रमुखपदी रत्नागिरी तालुक्यातील शिवसैनिक तथा नामदार डॉ. उदय सामंत व आमदार भैयाशेठ सामंत यांचे अत्यंत विश्वासू व एकनिष्ठ असणारे श्री. गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांची निवड झाली आहे.

गजानन पाटील हे मागील अनेक वर्ष नामदार उदय सामंत साहेब आणि आमदार भैयाशेठ सामंत साहेब यांच्या समवेत काम करत असताना समाजसेवा करत करत राजकारणामध्ये येऊन अनेक जबाबदारीची पदे भूषवली आहेत. नामदार डॉ. उदयजी सामंत यांनी सातत्याने त्यांच्यावर विश्वास दर्शवत विविध क्षेत्रातील विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या पदांचा सन्मान वाढवत श्री. गजानन पाटील यांनी सुद्धा आपल्या ज्ञानाच्या आणि अभ्यासपूर्ण कौशल्याच्या जोरावर, त्या पदाचा सन्मान वाढविला आहे. म्हणूनच नुकत्याच झालेल्या कार्यकारणीमध्ये श्री. गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांची रत्नागिरी उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे.

गजानन पाटील यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या निवडीबद्दल प्रतिक्रिया देत असताना श्री. गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी सांगितले की, मागील अनेक वर्ष सातत्याने नामदार डॉ. उदय सामंत आणि आमदार भैयाशेठ सामंत पितृतुल्य रवींद्र तथा अण्णा सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणात, राजकारणात काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी असून, यापूर्वी अनेकदा साहेबांनी अत्यंत विश्वासपूर्वक दिलेल्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडून, काम करण्याचा प्रयत्न केला आहे. तसाच या पदाच्या माध्यमातूनसुद्धा शिवसेनेचे सर्वत्र प्राबल्य निर्माण होईल यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याची ग्वाही नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी दिली.

गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांच्या या निवडीचे सर्वच स्तरावरून कौतुक होत असतानाच, त्यांच्या या निवडीने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button