महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची कार्यक्रम जाहीर होणार!

राज्य निवडणूक आयुक्त यांची आज पत्रकार परिषद

मुंबई दि. १३ :- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त यांची आज मंगळवारी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे आज मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी दु. ४.०० वाजता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

काल सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात आदेश देताना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याची मुभा द्यावी, असा राज्य निवडणूक आयोगाने केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला होता. त्यामुळे आज जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button