राजकीय वरदहस्त असलेली रत्नागिरीतील जलतरण तलावाच्या आरक्षित जागेतील १६ अनधिकृत बांधकामे नगर परिषदेने हटवली!
कोकण नगर येथीलही एक अनधिकृत बांधकामावरही कारवाई

रत्नागिरी दि. ३० :- रत्नागिरी शहर मंजूर सुधारीत विकास योजनेतील आरक्षण क्र. ११५ या “पोहण्याचा तलाव व बाजार केंद्र” करिता आरक्षीत असलेल्या जागेतील १५ अनधिकृत गाळे आणि एक रॅम्प नगर परिषदेकडून हटविण्याची कारवाई आज करण्यात आली. राजकीय वरदहस्त असलेली ही अनधिकृत बांधकामे नगर परिषदेकडून हटविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी शहर मंजूर सुधारीत विकास योजनेतील आरक्षण क्र. ११५ या “पोहण्याचा तलाव व बाजार केंद्र” करिता आरक्षीत असलेली ही जागा रत्नागिरी नगरपरिषदेच्या मालकीची आहे. सदर जमिनीमध्ये काही १५ गाळे व १ रँम्पचे बांधकाम करण्यात आले होते. या जमिनीतील केलेली बेकायदेशीर अतिक्रमणे ४८ तासांत काढून टाकणेची नोटीस नगर परिषदेकडून बजावण्यात आली होती.
परंतु या नोटीसीवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज नगर परिषदेकडून पोलिस बंदोबस्तात ही सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
या कारवाई बरोबरच नगर परिषदेकडून कोकण नगर येथील एक अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे.



