रत्नागिरी
राजापूर पाचल येथे टक्केवाडीतील महिलेचा संशयास्पद मृत्यू
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची तात्काळ घटनास्थळी भेट

राजापूर दि. १५ :- राजापूर पाचल येथे टक्केवाडी येथील राहणाऱ्या एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला असून, घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी. बी. महामुनी यांनी तात्काळ भेट दिली.
सदर ठिकाणी उप विभागीय पोलीस अधिकारी लांजा उप विभाग श्री सुरेश कदम, पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक श्री अमित यादव राजापूर पोलीस ठाणे हे उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांनी गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल होण्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले.



