
रत्नागिरी दि. १० सप्टेंबर :- महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून वाडेकर वाडी येथील कामे मार्गी लागल्यामुळे नाचणे येथील वाडेकर वाडीतील ग्रामस्थ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन भाजपा पक्षात प्रवेश केला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप सुर्वे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई, शहराध्यक्ष दादा ढेकणे, तालुका सरचिटणीस संकेत कदम, तालुका उपाध्यक्ष दिनेश रेमुळकर आदी उपस्थित होते.



