रत्नागिरी शहराच्या विविध विकास कामांसाठी शासनाकडून २० कोटीचा निधी मंजूर
रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांमुळे शहराच्या विकासाला मिळणार गती

रत्नागिरी दि. १३ जुलै :- नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषद रत्नागिरी करीता. १४ कोटी ३० लाख तर प्रभाग क्र.१ ते १६ मधील पूल व रस्त्यालगतचा नाला विकसित करणे कामासाठी ५ कोटी ७० लाख असा एकूण २० कोटीचा निधी शहरातील विविध विकास कामांसाठी शासनाने मंजूर केला आहे.
यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असल्याचे सांगण्यात येते.
नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेसाठी १४ कोटी ३० लाख निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रत्नागिरी नगरपरिषद प्रशासकीय इमारती मधील अनुज्ञेय विकासकामे कामे करणे ४ कोटी ८० लाख, रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.१ ते १६ मधील शाळेच्या इमारतींचे बांधकाम करणे ७ कोटी, रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील पानवल येथील पाणी वितरण व्यवस्थेचे काम करणे ७५ लाख तर रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील नाट्यगृहाचे अग्निशामक अनुषंगिक कामे करणे यासाठी १ कोटी ७५ लाख असा निधी मंजूर झाला आहे.
याशिवाय राज्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावयाच्या मोटार वाहन कराच्या अभिहस्तांकित रकमा-रस्ता अनुदान (अनिवार्य)” योजनेअंतर्गत रत्नागिरी नगरपरिषद, जि. रत्नागिरी करीता” पाच कोटी सत्तर लाख इतका निधी “रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्र.१ ते १६ मधील पूल व रस्त्यालगतचा नाला विकसित करणे.” या कामास मंजूर करण्यात आला आहे.



