रत्नागिरी

पावस जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांना “मागेल त्याला काजू” योजने अंतर्गत काजू रोपे वाटप कार्यक्रम

पावस दि. ११ जुलै :- रत्नागिरी तालुक्यातील पावस जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून “मागेल त्याला काजू” योजनेअंतर्गत काजू रोपांचे वाटप करण्यात आले.

सदरच्या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख श्री. विजय चव्हाण, उपविभाग प्रमुख श्री. प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य श्री. नामदेवजी कोकरे, पावस शाखाप्रमुख श्री. अभिजीत बळगे, मावळंगे शाखाप्रमुख श्री. विकासजी तावडे, ज्येष्ठ शिवसैनिक श्री. भाऊ थूळ, युवा सेनेचे श्री. निलेश गजने तसेच अनेक शिवसैनिक, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक श्री. राऊत यांनी आयोजकांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून शेतकऱ्यांना काजू लागवडीची योग्य पद्धत व त्यातून मिळणाऱ्या फायद्यांची सविस्तर माहिती दिली.

सर्व शेतकऱ्यांनी देखील पोमेंडी येथून झाडे आणण्याचा खर्च व वेळ वाचल्याबद्दल समाधान व्यक्त केले. एकाच ठिकाणी सर्वांना रोपे मिळाल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य व सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानले.

या संपूर्ण उपक्रमात पावस विभागाचे उपविभाग प्रमुख श्री. प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य श्री. नामदेव कोकरे, युवा सेनेचे श्री. निलेश गजणे, पावस शाखाप्रमुख श्री. अभिजीत बळगे, श्री. प्रवीण थुळ, श्री. कैलास आडवीरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

अजूनही पाच ऑगस्टपर्यंत आपण नाव नोंदणी करू शकता. अजूनही शासकीय रोपवाटिकांमध्ये काजू रोपे उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त जनतेने शेतकऱ्यांनी या संपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button