स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेववृद्धी महोत्सवाचा शुभारंभ
संस्थेच्या ठेवी ४५० कोटी पार नेण्याचे उद्दिष्ट - ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी दि. १९ :- २० जून ते २० जुलै हा ठेव वृद्धीमास घोषित झाला असून स्वरूपानंद पतसंस्थेने आकर्षक, विश्वासार्ह अश्या ठेव योजना घोषित केल्या असून ठेवीदारांच्या स्वागतासाठी स्वरूपानंदच्या सर्व शाखा, कार्यालय सज्ज झाली आहेत.
ठेववृद्धी मास हा संस्था आणि ग्राहक यांचा एकत्र येऊन साजरा होणारा उत्सव आहे. विश्वासार्हता, शिस्त, सातत्य आणि आर्थिक प्रबळता राखणारी स्वरूपानंद आणि आप्तेने, आपुलकीने संस्थेच्या ठेववृद्धी योजनांमध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार यांचा सुंदर मिलाफ प्रत्येक ठेववृद्धी मासात होत असतो. त्या महोत्सवाचा शुभारंभ आज २० जून रोजी होत आहे.
या ठेववृद्धी मासात आपल्या ठेवीदारांसाठी स्वरुपांजली ठेव योजना १२ ते १८ महिने, ९% ज्येष्ठ नागरिक व महिला, ८.७५% सर्वसाधारण व सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) ८.७५% ज्येष्ठ नागरिक व महिला, ८.५०% सर्वसाधारण अशा योजना संस्थेने जाहीर केल्या आहेत.
सर्व स्तरावरील ठेवीदारांना उत्तम ठेव पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जेष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी विशेष व्याजदराच्या योजना आखल्या आहेत. संस्थेच्या या ठेव योजनांना ठेवीदारांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करतांना संस्थेची उत्तम आर्थिक स्थिती, सातत्यपूर्ण वाढीव नफा, 0% NPA, कर्जाचे प्रमाण, १६४ कोटींच्या बँक गुंतवणूका, ४१५ कोटींच्या ठेवी, २७% सीआरएआर चे प्रमाण अशा उत्तम स्थितीत स्वामी स्वरूपानंद ठेवी दारांना ठेव ठेवण्यासाठी साद घालत आहे. या ठेव वृद्धीमासात ५० कोटीपर्यंत नव्या ठेवी जमा करण्याचे उद्दिष्ट संस्थेने नक्की केले आहे. हे उद्दिष्ट पार करून ४५० कोटींचा टप्पा पूर्ण करून ५०० कोटी ठेव संकलनासाठीचे मार्गक्रमण सुरू केले जाईल असे ॲड.पटवर्धन म्हणाले.
संस्थेच्या कार्यक्षेत्रात सर्वदूर संपर्क, संवाद करून संस्थेची आर्थिक उत्तम स्थिती व सातत्य ह्या बाबत ठेवीदारांना माहिती देत स्वरूपानंद पतसंस्थेची यंत्रणा ठेववृद्धीचा संकल्प पूर्णत्वाला नेईल असा विश्वास वाटतो.
ठेव वृद्धी बरोबरच वृक्ष संवर्धन उपक्रम
आजपर्यंत संस्थाकडे २४५८३ मुदत ठेव खाती आहेत. या ठेव वृद्धी मासात जेवढी खाती नव्याने उघडली जातील तेवढ्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचा संस्थेचा उपक्रम आहे. संस्थेच्या लावलेल्या झाडांच्या संगोपनाची व प्रतिवर्षी त्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्याचा मनोदय आहे. वृक्षारोपण व संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी धनवृद्धी इतकीच वृक्षवृद्धी महत्वाची हा संदेश देण्याच्या उद्देशाने वृक्ष लागवडीचे अभियान वृद्धीमासाशी जोडून हाती घेत आहोत.
२० जून २० जुलै या ठेव वृद्धीमासात ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात स्वरूपानंद मध्ये गुंतवणूक करावी असे विनम्र आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

