रत्नागिरी

भंडारी समाज संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन

रत्नागिरी दि. १९ : रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी दिली आहे. दरवर्षी प्रमाणे १० वीच्या परीक्षेत ७५% पेक्षा अधिक तसेच १२वी च्या परीक्षेत ७०% पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांचा आणि ७०% पेक्षा अधिक गुण मिळविणारे पदवीधर, पदविका, उच्च पदवीप्राप्त आणि विविध क्षेत्रात विषेश प्राविण्य मिळविणाऱ्यांचा सत्कार सोहळा रविवार ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत कित्ते भंडारी हॉल बंदर रोड रत्नागिरी या ठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची छायांकीत प्रत संघाच्या भागिर्थी भुवन खालची आळी येथील कार्यालयात मंगळवार ३० जून २०२६ पर्यंत आणून द्यावीत किंवा संघाचे सचीव श्री. चंद्रहास विलणकर मो.नं.९७६३८२४३११, उपाध्यक्ष श्री. कांचन मालगुडकर ९४२२५७६७९६, उपाध्यक्षा ॲड. सौ. प्रज्ञा तिवरेकर ९४०५६७४८५० सहसचिव श्री. उदय हातिसकर ९६६५७२५५२५ यांच्याशी संपर्क करुन मार्कशिट व आपला मोबाईल क्रमांक द्यावा. असे आवाहन अध्यक्ष श्री राजीव कीर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button