रत्नागिरी

भरणेनाका येथे मोटारीची आराम बसला पाठीमागून धडक; पाचजण गंभीर; महामार्गावर वाहतूक कोंडी

खेड दि. ९ : मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे नाका नजीक आराम बस ला मोटारीची पाठीमागून धडक बसुन अपघात झाला. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजता झाला.

मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बस भरणे नाका येथे प्रवासी उतरविण्यासाठी थांबली असताना मुंबई हून संगमेश्वर कडे मोटारीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात मोटारीतील पाज जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. या अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे ( वय -४८), शिल्पा परशुराम खेराडे ( वय – ५०), जनार्दन खेराडे ( वय -४०), परशुराम गुणाजी खेराडे ( वय – ६०) हे राहणार सर्व संगमेश्वर आणि अर्जुन धोंडीबा चाळके (वय – ३०, रा. सातारा) हे पाज जण गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व अपघातग्रस्तांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले तर परशुराम खेराडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार यांच्यासह भरणे येथील स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक यांच्या मदतीने खेड पोलिसांनी सर्व अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढले.

या अपघातामुळे महामार्गावर तब्बल अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघातात मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोटारीतील सिलेंडरचा टॅक गाडीच्या पुढील सिट वर आला होता. जर तो फुटला असता तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button