रत्नागिरी

लोवले मयूरबाग येथे सकल हिंदू संमेलनाचे १४ एप्रिल रोजी आयोजन

मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

संगमेश्वर दि. ७ ( प्रतिनिधी ):- हिंदू समाजाने सर्व प्रकारचे भेदभाव विसरुन हिंदू म्हणून संघटितपणे अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठीच हिंदू धर्म परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी विशाल सकल हिंदू संमेलन आयोजित केले आहे.

तरी सर्वांनी पारंपारिक मंगल पोशाखात सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून धर्मकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

संगमेश्वर विभागाचे सकल हिंदू संमेलन मंगळवार १४ एप्रिल २०२६ रोजी – सायंकाळी ०३.३० ते ०५.३० या वेळेत सुभाष पांचाळ यांचे शुभगंधा मंगल कार्यालय, मयुरबाग लोवले येथे संपन्न होणार असून सकल हिंदू समाजाने या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक, धर्माजी रामा जाधव माभळे जाधववाडी, सह संयोजक, विनय विश्वनाथ मुरकर नावडी संगमेश्वर, कोषाध्यक्ष चारुदत्त प्रभाकर भिडे माभळे भिडेवाडी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button