कृषीरत्नागिरी

आंबा बागायतदारांची गुरूवारी पुण्यात बैठक

रत्नागिरी दि. ७ :- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांची एक विशेष बैठक खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुण्यात कृषी आयुक्तालयात गुरूवारी (ता. ९) दुपारी १२ वाजता आयोजित केली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चुकीची किंवा भेसळयुक्त कीटकनाशकांचा पुरवठा झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत. याच्या वापरामुळे आंबापिकावर गंभीर विपरित परिणाम दिसून आला असून, फळगळ, झाडांची हानी तसेच मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना अनेक शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

या संदर्भात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाठवलेल्या पत्रानुसार संबंधित कंपन्या, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आणि बाधित शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष बैठक आयोजित केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button