रत्नागिरी- दादर पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

रत्नागिरी दि. ३० :- गेली अनेक वर्षे कोकण रेल्वे झाल्यापासून सुरू असणारी रत्नागिरी- दादर ही ट्रेन असंख्य कोकणकरांची हक्काची ट्रेन आपण बंद केली आहे ती पुन्हा दादर पासून सुरू करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने करण्यात आली.
असंख्य कोकणकर हे मुंबई सह उपनगरात विशेषता विरार वसई भोईसर मीरा भाईंदर ठाणे भांडुप अश्या ठिकाणी राहतात. अत्यंत चांगली अशी सुविधा कोकण रेल्वेने कोकण वासियांना विशेषता मध्यमवर्गीय जनतेला उपलब्ध करून दिली होती परंतु सदरची ट्रेन दादरपर्यंत बंद झाल्यामुळे सर्व कोकणकरांचे प्रचंड हाल होत आहेत तसेच आर्थिक नुकसान होत आहे.
आपणास विनंती आहे की, कोकणकरांच्या जीवनाशी निगडित असणारी रत्नागिरी दादर हे गाडी पूर्वीप्रमाणे दादर स्टेशनपर्यंत सुरू करावी. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. शेखर घोसाळे, शहरप्रमुख श्री. प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफले, महिला आघाडीच्या सौ. शिवानी सावंत माने उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, राजाराम रहाटे, प्रशांत सुर्वे, साजिद पावसकर उपस्थित होते.



