क्रीडारत्नागिरी

सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अॅकॅडमी दापोलीची रत्नागिरीत राष्ट्रीय स्तरावरील ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे याची उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरी दि. २९ :- तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या आणि रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असो. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी ’ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन टेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते.

मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही परीक्षा पार पडली ही परीक्षा अखिल भारतीय (ऑल इंडिया) स्तरावर आयोजित करण्यात आली होती.खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्याची आणि शारीरिक क्षमतेची कसून चाचणी या परीक्षेत घेण्यात आली.

या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेसाठी दापोलीतील प्रतिष्ठीत सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अॅकॅडमी दापोलीचा प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे पात्र झाला होता.

प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे यांने ही ब्लॅक बेल्ट 1 दान परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली. त्याला आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. प्रथमेश दाभोळे व महिला प्रमुख प्रशिक्षिका सौ प्रिती दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रद्युम्न दाभोळेच्या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा आणि सचिव सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे आणि कोषाध्यक्ष शशांक घडशी, विष्णू गोडसे, प्रदिप दाभोळे, सिध्दाई तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी दापोलीच्या अध्यक्ष प्रिती दाभोळे, सचिव प्रथमेश दाभोळे, सहसचिव महेश्वर जाधव, कोषाध्यक्षा श्रद्धा दाभोळे सदस्य श्री मंगेश गोडसे व श्री शैलेश मिसाळ यांनी प्रद्युम्नला शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button