रत्नागिरी

गोगटे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनकडून सहाय्य

रत्नागिरी दि. २९ :- आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन या रत्नागिरीमधील समाजसेवी संस्थेने सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून सागर महोत्सव व होतकरू विद्यार्थ्यांच्या गुणांना संधी देण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे साह्य गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयास दिले.आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी सागर महोत्सवाअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यास सांगितले.

आसमंत फाउंडेशन कोकण आणि पश्चिम घाटात शाश्वत विकास, निसर्ग संवर्धन, शिक्षण आणि संगीतासाठी काम करत आहे. फाउंडेशनने सागर महोत्सवसारख्या उपक्रमांद्वारे जबाबदार पर्यटन, पर्यावरण रक्षण आणि जैवविविधतेवर भर दिला. आपल्या सामाजिक जबादारीच्या भूमिकेतून सागर महोत्सव साजरा केला.

जबाबदार पर्यटन आणि समुद्र किनारा स्वच्छता या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जनजागृती उपक्रमांसाठी जे आर्थिक सहाय्य मिळाले, त्यातून १६ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला. तसेच समिक्षा नारायण सावंत (प्रथम वर्ष विज्ञान) या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनने आर्थिक मदतीचा हातभार लाभला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे हस्ते समिक्षा सावंत हिला धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, कलाशाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, प्रा. सचिन सनगरे आणि महेश सरदेसाई उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button