रत्नागिरीराजकीय

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या नावाची घोषणा

सभापती पदाचा कालावधी सव्वा वर्षाचा राहणार

रत्नागिरी दि. २४ :- शिवसेना मुख्यनेते ना.श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांचे आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी सभापती पदाची नावे जाहीर केली असून, सर्व पदांवरील नेमणूका या सव्वा वर्षाकरिता राहणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडीचा कार्यक्रम प्रशासनाकडून आधीच जाहीर करण्यात आला होता. बुधवारी २५ मार्च रोजी या निवडीची अधिकृत प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात विषय समित्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. धोरणात्मक निर्णय घेणे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विभागनिहाय कामकाजावर नियंत्रण ठेवणे, यामध्ये सभापतींची भूमिका निर्णायक ठरते. त्यामुळे या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, अनुभवी आणि अभ्यासू सदस्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये विलास चाळके उपाध्यक्ष (बांधकाम व आरोग्य विभाग), मयुरी मिलींद शिर्के: सभापती (महिला व बालकल्याण विभाग), महेश राघू नाटेकरः सभापती (कृषि व पशु संवर्धन विभाग), ॲड. सुयोग नंदकुमार कांबळे: सभापती (समाजकल्याण विभाग), नंदकुमार नारायण मुरकरः सभापती (अर्थ व शिक्षण विभाग) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button