रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का

रत्नागिरी दि. १२ :- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून,नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंप जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी मोजण्यात आली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर आणि रेखांश ७३.४४ पूर्व असा रत्नागिरी भागातच जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता.
भूकंपाची तीव्रता कमी असली तरी काही भागांतील नागरिकांना जमिनीला सौम्य कंप जाणवल्याने ते घराबाहेर आले होते.
प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



